Breaking News

अभाविपचे ‘झेप 2026’ व्यक्तिमत्व विकास शिबिर उत्साहात संपन्न

गडचिरोली (Gadchiroli) , ता. १८ : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP), गडचिरोली यांच्या वतीने आयोजित ‘झेप २०२६’ व्यक्तिमत्व विकास शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरात विविध विषयांवर मार्गदर्शनपर सत्रांचे आयोजन करण्यात आले.
दहावी व बारावीनंतर उपलब्ध करिअरच्या संधी, सायबर क्राईम व सोशल मीडिया जागरूकता, लीडरशिप स्किल, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), टाइम मॅनेजमेंट आणि पॉझिटिव्ह थिंकिंग यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या सत्रांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाचे उद्घाटन महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. योगेश पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी गडचिरोली विभाग संघटन मंत्री राहुलजी श्यामकुवर, नगराध्यक्ष प्रा. सुनिता साळवे आणि नगर मंत्री संकेत म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरात गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य सतिश चिचघरे, सिक्युरिटी अधिकारी देविकारा तामशेटवार, प्रा. धर्मेंद्र मुनघाटे, प्रा. विकास चित्ते, विकास बोदलकर, दीक्षा पिंपरे आदी मान्यवरांनी विविध विषयांवर मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना प्रेरित केले.

‘झेप २०२६’ शिबिरामुळे विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास, नेतृत्वगुण आणि करिअरविषयक नवे दृष्टिकोन मिळाले. मान्यवरांच्या मार्गदर्शनातून हे शिबिर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत यशस्वीरीत्या संपन्न झाले.

 

#ABVP
#Zhep2026
#अभाविप
#झेप2026
#GadchiroliNews
#Gadchiroli
#StudentDevelopment
#PersonalityDevelopment
#CareerGuidance
#YouthLeadership
#CyberAwareness
#ArtificialIntelligence
#EducationNews
#MaharashtraNews
#विद्यार्थीविकास

———————————————

About Nandivedh

Check Also

शहीद पोलिसाच्या मुलाची कोट्यवधींची फसवणूक करणारा पुण्यातून अटकेत!

गडचिरोली (Gadchiroli), ता. २२ : नोकरीचे आमिष दाखवत शहीद जवानाच्या कुटुंबाची तब्बल २ कोटी १६ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *