Breaking News

दुपारी 12 ते 4 बाहेर जाणे टाळा; राज्यावर उष्णता आणि पावसाचे दुहेरी संकट

मुंबई:- राज्यात सध्या हवामानात मोठे चढ-उतार पाहायला मिळत असून नागरिकांसमोर उष्णता आणि अवकाळी पावसाचे दुहेरी संकट उभे ठाकले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला असून ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तर कोकणआणि विदर्भात उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

विदर्भातील अकोलायेथे तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून चंद्रपूर, गडचिरोली, वर्धाआणि अमरावतीयेथेही 44 अंशांच्या आसपास तापमानाची नोंद झाली आहे. उष्णतेच्या या तीव्रतेमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी दुपारच्या वेळी रस्ते ओस पडलेले दिसत आहेत.
हवामान विभागाने नागरिकांना विशेषतः दुपारी 12 ते 4 या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. पुरेसे पाणी पिणे, हलके कपडे वापरणे आणि उन्हापासून बचाव करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, काही भागात उष्णतेची तीव्रता लक्षात घेता शाळा आणि कोचिंग क्लासेसना तात्पुरती सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मालेगावमध्ये 43.4°C तापमानाची नोंद होत एप्रिल महिन्यातील विक्रमी उष्णता अनुभवायला मिळाली. उष्णतेचा परिणाम शेतीवरही जाणवत असून जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात झेंडू फुलांच्या पिकावर मोठा परिणाम झाला आहे.

वाढत्या तापमानामुळे फुलांची वाढ खुंटणे, कळ्या गळणे आणि उत्पादनात घट होणे असे परिणाम दिसून येत आहेत. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने मागणी वाढली असली तरी आवक कमी झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे.

 

#Heatwave #WeatherAlert #IMDAlert #ClimateUpdate #BreakingNews #MaharashtraWeather #HeatAlert #YellowAlert #Mumbai #Maharashtra #Vidarbha #Akola #Chandrapur #Gadchiroli #Amravati #Wardha #Malegaon #Jalgaon #ExtremeHeat #Summer2026 #HeatWaveIndia #StaySafe #PublicAlert #HotWeather #WeatherNews #ClimateChange #Farmers #CropDamage #AgricultureCrisis #Marigold #FarmingNews #AgriNews #Breaking #ViralNews #LatestNews #NewsUpdate #StayAlert #PublicSafety #TrendingNow 🚀

About Nandivedh

Check Also

लॉयड्स एलकेएएमची उल्लेखनीय कामगिरी ४०० सुरक्षित प्रसूती आणि आधुनिक मातृत्वसेवेचा नवा आदर्श

गडचिरोली (Gadchiroli), ता. २० : ग्रामीण आरोग्यसेवेत नवे मानदंड निर्माण करत हेडरी येथील लॉयड्स काली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *