Breaking News

गडचिरोलीतील विकास कामांना गती; प्रलंबित फाईल्स फास्टट्रॅकवर – मुख्य सचिवांचे निर्देश

गडचिरोली (Gadchiroli): विकासकामांना वेग देण्यासाठी मंत्रालय स्तरावर प्रलंबित असलेल्या सर्व फाईल्स तत्काळ फास्टट्रॅकवर घेण्याचे निर्देश राज्याचे मुख्य सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले. यासोबतच वनहक्कधारक शेतकऱ्यांना लवकरात लवकर ‘फार्मर आयडी’ उपलब्ध करून देण्यावरही त्यांनी विशेष भर दिला.

आज दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेण्यात आला. यावेळी अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत महसूल, खनिकर्म, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम, क्रीडा आणि आरोग्य विभागांकडून प्रलंबित असलेल्या प्रस्तावांचा आढावा घेऊन त्यांना तातडीने प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी पाठपुरावा वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

तसेच जिल्हा परिषद व इतर विभागांतील रिक्त पदे येत्या मे अखेरपर्यंत भरण्याचे निर्देश देण्यात आले. वनजमिनीचे पट्टे मिळालेल्या शेतकऱ्यांना ‘फार्मर आयडी’ देऊन त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हे प्राधान्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी रस्ते व पुलांच्या कामांना गती देण्याबरोबरच जलसंपदा विभागातील प्रलंबित प्रकल्पांना मंजुरी देऊन प्रत्यक्ष कामे सुरू करण्यावर भर देण्यात आला.

केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेताना प्रधानमंत्री आवास योजना (शहरी व ग्रामीण) तसेच पीएम सूर्यघर योजनेतील कमी प्रगतीबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. अपूर्ण घरकुलांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देतानाच प्रलंबित हप्त्यांसाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असेही सांगण्यात आले. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधीचा परिणामकारक वापर करत प्रलंबित कामे लवकर पूर्ण करण्याचे आवाहन मुख्य सचिवांनी केले. सर्व विभागांनी समन्वय राखून गुणवत्तापूर्ण कामकाज करावे, असेही त्यांनी नमूद केले.

अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आपण विशेष दौऱ्यावर असल्याचे सांगितले, तर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सादरीकरणाद्वारे विविध कामांची माहिती दिली.

 

#Gadchiroli #GadchiroliNews #MaharashtraNews #BreakingNews #LatestNews #IndiaNews #Development #FastTrack #GovernmentAction #RajeshAgrawal #AdminUpdate #DistrictDevelopment #RuralDevelopment #AdivasiDevelopment #FarmerID #ForestRights #GovernmentSchemes #PMAY #PMAYUrban #PMAYGramin #PMSuryaGhar #Infrastructure #PublicWorks #NationalHighway #WaterResources #GoodGovernance #TrendingNews #ViralNews #NewsUpdate #LocalToGlobal

———————————————————-

About Nandivedh

Check Also

शहीद पोलिसाच्या मुलाची कोट्यवधींची फसवणूक करणारा पुण्यातून अटकेत!

गडचिरोली (Gadchiroli), ता. २२ : नोकरीचे आमिष दाखवत शहीद जवानाच्या कुटुंबाची तब्बल २ कोटी १६ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *