मुंबई, मंत्रालय प्रतिनिधी:
अनुसूचित जाती, जमाती,विजा भज/ई.मा.व./ वि.मा.प्र शासकीय- निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना, महाराष्ट्रराज्य, मंत्रालय,मुबंईया संघटनेच्या वतीने मंत्रालयात मा.महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मंञालय मा. भारत वानखेडे यांच्या हस्ते माजी आमदार तथा भाजपा आदिवासी मोर्चाचे नव्याने नियुक्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांचा शाल, पुष्पगुच्छ व संविधान पुस्तिका तसेच बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा भेट देऊन भव्य सत्कार करण्यात आला. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या प्रसंगी संघटनेच्या शिष्टमंडळाने SC, ST, OBC, VJ-NT व इमाव घटकांशी संबंधित प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. शिक्षण, नोकरी, पदोन्नती, आरक्षणातील अडचणी तसेच प्रशासकीय स्तरावर येणाऱ्या अडथळ्यांबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत महसूल मंत्री बावनकुळे यांनी लवकरच मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत बैठक आयोजित करून संबंधित विषयांवर ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
आपल्या सत्काराला उत्तर देताना माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी सांगितले की, “SC, ST, OBC, VJ-NT व इमाव घटकांच्या प्रश्नांकडे केवळ सामाजिक दृष्टीकोनातून नव्हे तर सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे. आरक्षण, पदोन्नती, शिक्षण व रोजगारातील अडचणी दूर करण्यासाठी शासनाने ठोस धोरण राबवावे. सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत राहू.” असे प्रतिपादन केले.
यावेळी मा.महसूल मंत्री महोदय ना.बावनकुळे यांनीही संघटनेला आश्वस्त करत सांगितले की, “आपण मांडलेले सर्व प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असून शासन त्यावर गांभीर्याने विचार करत आहे. संबंधित विभागांशी समन्वय साधून मुख्यमंत्री स्तरावर लवकरच बैठक घेण्यात येईल. SC, ST, OBC व इतर घटकांच्या न्याय्य मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
तसेच, दि. 16 एप्रिल रोजी मंत्रालयात होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरया महापरूषाच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे निमंत्रणही यावेळी मा.महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार डॉ. देवराव होळी यांना देण्यात आले.
या कार्यक्रमास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत वानखेडे, कार्याध्यक्ष अंबादास चंदनशिवे, मुंबई प्रदेश अध्यक्ष सुबोध भारत, कार्याध्यक्ष सुभाष गवई, श्रीमती मंगल नाखवा, सोनाली चंदनशिवे, भिकेन ठाकूर, राष्ट्रपाल तायडे, सिद्धू वाकोडे, सविता शिंदे, सी. आर. निखारे, अशोक सेजुळ, अशोक जाधव, राजेंद्र बच्छाव, प्रज्ञा मेश्राम, दीपाली सहारे, विजय नांदेकर, बाबुसिंग राठोड, डॉ. उत्तम सोनकांबळे, डॉ. बनसोड, राज श्रॉफ आदी मान्यवर उपस्थित होते.
एकूणच, या भेटीतून संघटनेच्या प्रलंबित प्रश्नांना शासन स्तरावर गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली असून माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी व इतर मागास घटकांच्या प्रश्नांना नवे बळ मिळणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
#मुंबई #मंत्रालय #डॉदेवरावहोळी #DevraoHoli #BJP #भाजपा #आदिवासीमोर्चा #MaharashtraPolitics #PoliticalNews #BreakingNews #Leadership #MaharashtraNews #सत्कार #नवीनजबाबदारी #SCST #OBC #VJNT #Reservation #SocialJustice #Ambedkar #Phule #ShivajiMaharaj #Government #Policy #PublicIssues #NandivedhNews
————————————————-
NandiVedh NEWS WEBSITE