गडचिरोली (Gadchiroli), ता. २२ : नोकरीचे आमिष दाखवत शहीद जवानाच्या कुटुंबाची तब्बल २ कोटी १६ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला गडचिरोली पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली. स्थानिक गुन्हे शाखा व गडचिरोली पोलिस स्टेशनच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
माहितीनुसार, सन २०१३ मध्ये तोडगट्टा जंगल परिसरातील माओवादी चकमकीत पोलिस अंमलदार गणपत नेहरू मडावी शहीद झाले होते. त्यानंतर त्यांच्या मुलगा सागर मडावी यांनी अनुकंपा तत्त्वावर वर्ग-१ पदासाठी अर्ज केला होता. याच प्रक्रियेचा फायदा घेत आरोपी ज्ञानेश्वर शिवाजी वरे (रा. वरोडी खुर्द, ता. भोर, जि. पुणे) याने मंत्रालयात ओळख असल्याचे सांगत नोकरी लावून देण्याचे खोटे आश्वासन दिले.

या बहाण्याने आरोपीने इतर चार जणांच्या मदतीने सागर मडावी व त्यांच्या आईकडून वेळोवेळी रोख, ऑनलाईन व्यवहार व एटीएमद्वारे एकूण २ कोटी १६ लाख ७९ हजार १०० रुपये उकळले. या प्रकरणी २० एप्रिल २०२६ रोजी गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक पुरावे व साक्षीदारांच्या आधारे आरोपीचा माग काढत पुण्यातून त्याला ताब्यात घेतले. सहायक पोलिस निरीक्षक समाधान दौड व विजय मुसनवार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली.
आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
#BreakingNews
#CrimeNews
#Gadchiroli
#GadchiroliNews
#PuneCrime
#FraudCase
#JobScam
#ScamAlert
#PoliceAction
#Arrested
#Justice
#IndianPolice
#MaharashtraNews
#CrimeUpdate
#FraudAlert
#NewsUpdate
#ViralNews
#TrendingNow
#PublicAwareness
#StayAlert
————————————–
NandiVedh NEWS WEBSITE