Breaking News

भाजप महिला आघाडीची “दिवार स्वाक्षरी” मोहिम; नारीशक्ती वंदन विधेयकाला उत्स्फूर्त समर्थन

गडचिरोली (Gadchiroli) दि. १२ एप्रिल : लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणाऱ्या ऐतिहासिक नारीशक्ती वंदन विधेयकाच्या समर्थनार्थ भारतीय जनता पार्टी महिला आघाडी, जिल्हा गडचिरोलीच्या वतीने “दिवार स्वाक्षरी” मोहिमेचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

सनातन संस्थेच्या संचालिका सौ. लताताई समर्थ यांच्या हस्ते स्वाक्षरी करून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमात आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार परिणय फुके, माजी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी आमदार डॉ. देवराव होळी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभाग नोंदवून स्वाक्षरीद्वारे आपला पाठिंबा दर्शविला.

याशिवाय विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने या मोहिमेत सहभागी होत स्वाक्षऱ्या केल्या. महिलांचा विशेष सहभाग या मोहिमेत पाहायला मिळाला. तसेच ९६६७१७३३३३ या क्रमांकावर मिस कॉल देऊनही अनेकांनी या विधेयकाला आपले समर्थन नोंदविले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिलांना राजकारणात समान संधी मिळावी या उद्देशाने हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. महिलांच्या राजकीय सक्षमीकरणासाठी आणि निर्णय प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी हे विधेयक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमात भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा पदाधिकारी, नगरसेविका, कार्यकर्त्या तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहभागी महिलांनी या विधेयकाचे स्वागत करत, महिलांच्या सशक्तीकरणाच्या दिशेने हा एक ऐतिहासिक आणि सकारात्मक निर्णय असल्याचे मत व्यक्त केले.

“दिवार स्वाक्षरी” मोहिमेच्या यशस्वी आयोजनासाठी भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ. योगिताताई पिपरे तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी सुयोग्य पद्धतीने पार पडल्यामुळे मोहिमेला व्यापक प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

 

#NariShakti
#WomenReservation
#33PercentReservation
#WomenEmpowerment
#NaariShaktiVandan
#BJP
#MahilaAghadi
#NarendraModi
#ModiGovernment
#WomenInPolitics
#PoliticalNews
#TrendingNow
#BreakingNews
#IndiaNews
#MaharashtraNews
#Gadchiroli
#GadchiroliNews
#LocalNews
#SignatureCampaign
#SupportWomen
#EmpowerWomen
#NewIndia

 

—————————————–

About Nandivedh

Check Also

शहीद पोलिसाच्या मुलाची कोट्यवधींची फसवणूक करणारा पुण्यातून अटकेत!

गडचिरोली (Gadchiroli), ता. २२ : नोकरीचे आमिष दाखवत शहीद जवानाच्या कुटुंबाची तब्बल २ कोटी १६ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *