Breaking News

लॉयड्स एलकेएएमची उल्लेखनीय कामगिरी ४०० सुरक्षित प्रसूती आणि आधुनिक मातृत्वसेवेचा नवा आदर्श

गडचिरोली (Gadchiroli), ता. २० : ग्रामीण आरोग्यसेवेत नवे मानदंड निर्माण करत हेडरी येथील लॉयड्स काली अम्माल मेमोरियल (एलकेएएम) रुग्णालयाने दोन महत्त्वपूर्ण टप्पे यशस्वीरित्या पार केले आहेत. रुग्णालयात एपिड्युरल अ‍ॅनेस्थेशियाच्या साहाय्याने वेदनारहित सामान्य प्रसूती यशस्वीपणे पार पडली असून ४००व्या सुरक्षित बाळाच्या जन्माचा आनंदही साजरा करण्यात आला आहे. या कामगिरीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील मातृ व नवजात आरोग्य सेवेत सकारात्मक बदल होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अलीकडे पार पडलेली एपिड्युरल सहाय्यित प्रसूती पूर्णतः सुरक्षित आणि गुंतागुंतीविना झाली. या प्रक्रियेदरम्यान एपिसिओटॉमीची आवश्यकता भासली नाही, तसेच कोणतेही पेरिनियल इजा किंवा प्रसूतीनंतर रक्तस्राव झाला नाही. ‘डिलेयड कॉर्ड क्लॅम्पिंग’ आणि आधुनिक वाय-फाय आधारित CTG मॉनिटरिंगसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून आई व बाळाच्या आरोग्याची प्रभावीपणे काळजी घेण्यात आली.

दरम्यान, गर्देवाडा येथील १९ वर्षीय सविता टोप्पो यांना उच्च-जोखीम गर्भावस्थेमुळे गट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रातून एलकेएएम रुग्णालयात हलविण्यात आले होते. डॉक्टरांनी तातडीने योग्य उपचार करून १५ एप्रिल २०२६ रोजी सुरक्षित प्रसूती घडवून आणली. सध्या माता आणि बाळ दोघेही निरोगी असून त्यांची काळजी घेतली जात आहे.

ही कामगिरी एलकेएएम रुग्णालयाच्या वाढत्या क्षमतेचे प्रतीक असून दुर्गम व आदिवासी भागात गुणवत्तापूर्ण, मोफत आणि सुलभ आरोग्यसेवा देण्याच्या ध्येयाला बळकटी देणारी आहे. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या “सर्वांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा” या दृष्टिकोनातून हे उपक्रम राबविले जात आहेत. तसेच लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनच्या संचालिका कीर्ती रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णकेंद्रित सेवांना विशेष प्राधान्य दिले जात आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ वैद्यकीय सेवांच्या बळावर एलकेएएम रुग्णालय ग्रामीण भागातील मातृत्व सेवांना नवी दिशा देत असून, ४०० सुरक्षित जन्मांचा टप्पा ही त्यांच्या समर्पित सेवाभावाची प्रभावी साक्ष ठरत आहे.

 

About Nandivedh

Check Also

शहीद पोलिसाच्या मुलाची कोट्यवधींची फसवणूक करणारा पुण्यातून अटकेत!

गडचिरोली (Gadchiroli), ता. २२ : नोकरीचे आमिष दाखवत शहीद जवानाच्या कुटुंबाची तब्बल २ कोटी १६ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *