Breaking News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरात वाहतूक निर्बंध लागू

गडचिरोली–आरमोरी, चंद्रपूर, धानोरा, चामोर्शी मार्ग १४ एप्रिल रोजी सायंकाळी ४ ते मध्यरात्रपर्यंत बंद

गडचिरोली (Gadchiroli) दि. १३ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गडचिरोली शहरातील मुख्य इंदिरा गांधी चौकात होणाऱ्या उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये आणि वाहतूक सुरळीत राहावी यासाठी जिल्हा प्रशासनाने १४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजेपासून ते रात्री १२ वाजेपर्यंत गडचिरोली–आरमोरी, चंद्रपूर, धानोरा व चामोर्शी या मार्गावरील वाहतुकीवर तात्पुरते निर्बंध लागू केले आहेत.

जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम ११५ व ११६ अंतर्गत प्राप्त अधिकाराचा वापर करून हा आदेश जारी केला आहे. या कालावधीत संबंधित मार्गावर दोन्ही बाजूंनी अवजड तसेच हलक्या वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे. मात्र रुग्णवाहिका, प्रवासी बसेस तसेच पाणीपुरवठा, महावितरण, दुरसंचार व रस्ते दुरुस्तीशी संबंधित अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना या निर्बंधातून वगळण्यात आले आहे.

सदर आदेशाचे काटेकोर पालन करावे, अन्यथा आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर भारतीय दंड संहिता १८६० व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अन्वये कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हादंडाधिकारी श्री. पंडा यांचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

#AmbedkarJayanti #AmbedkarJayanti2026 #DrBabasahebAmbedkar #JaiBhim #BreakingNews #ViralNews #Gadchiroli #GadchiroliNews #GadchiroliUpdate #Armori #Chandrapur #Dhanora #Chamorshi #MaharashtraNews #TrafficUpdate #TrafficAlert #RoadClosed #PublicNotice #CityUpdate #PoliceUpdate #AdministrationAlert #StaySafe #PublicAwareness #CityLife #LocalUpdate #NewsMarathi #MarathiNews

—————————————————

About Nandivedh

Check Also

शहीद पोलिसाच्या मुलाची कोट्यवधींची फसवणूक करणारा पुण्यातून अटकेत!

गडचिरोली (Gadchiroli), ता. २२ : नोकरीचे आमिष दाखवत शहीद जवानाच्या कुटुंबाची तब्बल २ कोटी १६ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *